![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ; सुदीपकुमार देवकर। दि. २१ जुलै । कळंब दि.२०(प्रतिनीधी) उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील धानोरी येथे दि.१८जुलै रोजी अंगणडीत गेलेल्या एका ५ वर्षीय चिमुकलीचा गावातीलच शत्रुघ्न लहु जाधव या नराधमाने बिस्किटे व चाॅकलेट देतो म्हणुन घेउन जाऊन एका बंद असलेल्या घरामध्ये नेहुन तिच्या शरिरावरील कपडे काढून तिच्या सोबत छेडछाड केली असल्याने मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली असुन सदरील घटनेचा मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना कळंब तहसीलदार मुस्तफा खोंदे यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे.देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सदरील व्यक्तिने मानुसकिला काळीमा फासणारी घटना घडवली असुन एका ५वर्षीय लहान मुलिसोबत असे कृत्य केल्याबद्दल त्याचा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवुन संबंधीत व्यक्तिला कठोरातील कठोर शिक्षा देऊन त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी.
अशी मागणी करण्यात आली आहे. सदरील निवेदनावर मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे,लाल पॅथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे, जिल्हाध्यक्षा सौ माया शिंदे,मानवहितचे जिल्हा सचिव संतोष उपरे, तालुकाध्यक्ष धनंजय ताटे,संघटक दत्ता झोंबाडे, सामाजिक कार्यकर्ते रामरतन कांबळे,ताजखाॅ पठाण,गौतम हजारे, अनिल गाडे,शहाजी कांबळे,सुजीत शिंदे यांच्या स्वाक्षर्या आहेत.