Sanjay Raut: ईडीचं दुसऱ्यांदा समन्स येऊनही संजय राऊत बिनधास्त ; भीती हेच मनुष्याच्या शोषणाचे कारण………

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । सक्तवसुली संचलनालय अर्थात ‘ईडी’ने दुसऱ्यांदा समन्स बजावूनही शिवसेना नेते संजय राऊत यांचा लढण्याचा निर्धार ठाम असल्याचे दिसत आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने काल चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, संसदेच्या अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी वेळ वाढवून मागितला होता. परंतु, ईडीने (ED) संजय राऊत यांची ही विनंती फेटाळत त्यांना बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे नवे समन्स बजावले. आता त्यांना त्यांना २७ जुलैला चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही तासांमधील संजय राऊत यांची ट्विटस ही चर्चेचा विषय ठरत आहेत.

काही तासांपूर्वी संजय राऊत यांनी एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी वेळ वाईट असेल तर लोक तुमचा हात पकडण्यापेक्षा ‘चुका’ पकडतात, असे म्हटले होते. तर तत्पूर्वी संजय राऊत यांनी आणखी एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी आणखी एक ट्विट केले आहे. भीती हेच मनुष्याच्या शोषणाचे कारण असते, हा ओशोंचा सुविचार राऊत यांनी लिहला आहे. त्यापुढे जो डर गया वो मर गया. जय महाराष्ट्र!, असेही संजय राऊत यांनी लिहले आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा लढण्याचा निर्धार कायम असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *