महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीचं थोड्याच वेळात मतदान सुरू होणार आहे. मतमोजणी झाल्यानंतर देशाचे 15 वे राष्ट्रपती होण्यासाठी राम नाथ कोविंद यांच्यानंतर कोण होणार हे संपुर्ण भारताला लवकरच कळेल. सर्व राज्यांतील मतपेट्या संसद भवनात दाखल झाल्या आहेत. मतदान अधिकारी 63 क्रमांकाच्या खोलीत मतमोजणी सुरू करण्यासाठी सज्ज आहेत, संसदेच्या स्ट्राँग रूममध्ये जिथे पेट्या चोवीस तास सुरक्षा ठेवल्या जातात. संपुर्ण देशाचं लक्ष आजच्या मतमोजणीकडे लागलं आहे.