ही कंपनी भारतात हायड्रोजन स्कूटर लाँच करणार

 87 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुलै । अमेरिकेची वाहन निर्माता कंपनी Triton Electric Vehicle (ट्रायटन इलेक्ट्रीक व्हेईकल) भारतात आपली पहिली स्कूटर लाँच करण्याची जोरात तयारी करत आहे. भारतात लवकरच हायड्रोजनवर चालणारी दुचाकी आणि तिचाकी वाहने लाँच करणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे.

ट्रायटन ईव्ही कंपनी ही वाहने भारतातच बनविणार आहे. कंपनीने या वाहनांच्या लाँचिंगची तारीख अद्याप सांगितलेली नाही. टेस्लाला टक्कर देणाऱ्या या कंपनीने मार्चमध्ये भारतात येत असल्याची आणि गुजरातच्या भुजमध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांट लावत असल्याची घोषणा केली होती.

ट्रायटनचे सीईओ आणि सहसंस्थापक हिमांशु पटेल यांनी शुक्रवारी याची घोषणा केली. लवकरच आमच्याकडे भारतीय रस्त्यांवर धावणारी दुचाकी असेल असे ते म्हणाले. हायड्रोजनवर चालणाऱी वाहने आमच्यासाठी प्राधान्य असतील असे ते म्हणाले.

भुज प्लांट 600 एकरांवर पसरलेल्या जमिनीवर उभारण्यात आला आहे. हा प्लांट 3 दशलक्ष चौरस फूट आकाराचा असेल. हायड्रोजन-आधारित वाहने गुजरातची राजधानी अहमदाबादजवळील आनंद येथील संशोधन आणि विकास केंद्रात विकसित केली जात आहेत. हा प्लांट ट्रायटन ईव्हीसाठी जागतिक संशोधन आणि विकास केंद्र म्हणूनही काम करेल. ट्रायटन जागतिक बाजारपेठेत ईव्ही इलेक्ट्रिक कार, ट्रक सारख्या वाहनांची विक्री करते. या प्लँटमधून भारत आणि आशियाई देशांमध्ये देखील कंपनी कार, ट्रकची विक्री करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *