हे बंड नाही, त्यांनी गद्दारीच केली, हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार – आदित्य ठाकरे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुलै । शिवसेनेत असताना या चाळीस गद्दारांना आपण वेळोवेळी आपण पदे दिली, त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली ,नाव दिलं ,वेळप्रसंगी आमदार, खासदार केलं, मंत्रीपद दिलं एवढं सगळं दिलं असताना त्यांनी गद्दारी केली ही गद्दारी कोणालाच आवडलेली नाही. त्यांनी बंड नाही तर गद्दारीच केली आहे , गद्दार आहेत ते राज्य करू शकत नाही, असा खणखणीत इशारा शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी नेवासा येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये दिला. विशेष म्हणजे भर पावसामध्ये ही अर्धा तास ही सभा झाली. आदित्य ठाकरे यांनी कोणतेही कवच न घेता पावसात भाषण करून जनतेचे आशीर्वाद आणि प्रेम मिळवले. पाऊस कोसळत असतानाही या सभेला प्रचंड गर्दी झाली होती.

संभाजीनगरचा दौरा झाल्यानंतर संवाद यात्रा ही शिर्डीकडे जात असताना नेवासा फाटा येथे शिवसेनेच्या वतीने आदित्य ठाकरे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, आमदार उदय रजपूत, माजी मंत्री बबनराव घोलप, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख आमदार सुनिल शिंदे, शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे ,जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी ,युवा सेनेचे उदयनराजे गडाख आदी यावेळी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले की, आज मी मराठवाडा संभाजीनगर या ठिकाणी गेलो होतो प्रचंड असा प्रतिसाद शिवसेनेला मिळत आहे. सध्या आपले सरकार नसले तरी जनतेची साथ आपल्याला आहे. शिवसेनेची सत्ता असताना आपल्या चाळीस गद्दारांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला, वास्तविक पाहता यांना पक्षांमध्ये असताना आपण पदे दिली, त्यांना मानसन्मान दिला, वेळप्रसंगी आमदार ,खासदार केले ,मंत्री केले, पण हे सर्व ते विसरले व त्यांनी गद्दारी करून सत्ता स्थापन केली. वास्तविक पाहता हे आता आम्ही बंड वगैरे केले असे सांगता देत पण हे बंड नाही तर ही गद्दारीच आहे, जे गद्दार आहे ते राज्य करू शकत नाही, असे ते म्हणाले. ते गेल्याचं आम्हाला दुःख नाही पण या दु: खातून बाहेर पडण्यासाठी आता मी तुमच्याकडे आलो आहे असे ते म्हणाले.

गद्दारांचे सरकार टिकणार नाही, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच असे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. सभागृहामध्ये आम्ही असताना हे गद्दार आमच्या समोर होते. मात्र ते आमच्याशी नजरेला नजर देऊ शकत नव्हते, असे ते म्हणाले. आज शिवसेनेबरोबर जे आमदार आहेत ते शूरवीर आहेत, असे ते म्हणाले. ज्यांना आपण वर्षानुवर्ष सांभाळलं त्यांनी गद्दारी केली, हे आपल्याला समजू शकले नाही. शेवटी गद्दार तो गद्दारच असतो हे पण सगळ्यांनी लक्षात ठेवावे असे ते म्हणाले. हे गद्दार तिकडे गेले आता त्यांना त्या ठिकाणी काय मिळणार आणि यांचे कशा पद्धतीने जग बदलणार असा टोला त्यांनी यावेळी लगावला. त्यांना शिवसेनेमध्ये असताना जी किंमत होती ती आता त्यांना मिळेल का, असा सवाल त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *