लवकरच ह्युंदाईची आय 30 ची एन्ट्री होण्याची शक्यता

 74 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुलै । दक्षिण कोरियाची कंपनी भारतातील ह्युंदाईचे दुसरे स्थान डळमळीत झाले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये टाटाने मोठी झेप घेत दुसरे स्थान पटकावले होते. गेल्याच महिन्यात पुन्हा ह्युंदाईला दुसरे स्थान मिळविता आले आहे. असे असताना ह्युंदाई येत्या काळात नवनवीन फिचर्स आणि लुकच्या कार भारतीय बाजारात आणण्याची शक्यता आहे.

कंपनीने प्रिमिअम एसयुव्ही टुसोवरून पडदा काढला आहे. या ह्युंदाईच्या आय ३० ची भारतात एन्ट्री होण्याची चर्चा गरम झाली आहे. या कारमध्ये बोल्ड डिझाईन आणइ स्पोर्टी लुकसोबत अद्ययावत फिचर्स पहायला मिळू शकतात. ह्युंदाईच्या वेबसाईवर देखील या कारबाबत माहिती दिसू लागली आहे.

ही कार मर्सिडीजच्या एसयुव्हींसारखी दिसणार आहे. या हॅचबॅकची लांबी जास्त असणार आहे. तसेच लेटेस्ट डिझाईनचा फ्रंट लुक स्पोर्टी आणि आकर्षक असणार आहे. स्पोर्टी ग्रिल आणि हेडलँप, टेललँप आणि रुंद टायर दिसणार आहेत. विविध कलर ऑप्शन्ससह ही कार असेल असा अंदाज आहे.

यामधील फिचर्सची रंगलेली चर्चा म्हणजे यात ADAS, मोठी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम अदी असण्याची शक्यता आहे. व्हेंटिलेटेड सीटदेखील असतील. Hyundai i30 मध्ये एक शक्तिशाली इंजिन दिले जाऊ शकते. जे 48V माइल्ड हाइब्रिड सिस्टिमचे असेल. म्हणजेच या कारचे मायलेज चांगले असेल. इंटेलिजेंट मॅनुअल ट्रांसमिशन (iMT) दिले जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *