महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुलै । सरकारमध्ये येऊनही भूक संपली नाही का असा रोकडा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना केला आहे. तर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी तातडीने अधिवेशन बोलवा असे म्हणत शेतकऱ्यांना आणि जनतेला दिलासा द्यावे असेही म्हटले आहे. मराठवाडा, विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्र लिहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्य सरकारने यासाठी तातडीने अधिवेशन बोलवत शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा द्यायला हवा असे अजित पवारांनी पत्रात नमुद केले आहे.
पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान
जून 20 पासून विदर्भ आणि मराठवाड्यांच्या काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक नदी – नाल्यांना पूर आला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले असून अनेकांच्या शेतातील माती खरडून गेली आहे. अनेकांनवर दुबार अन् तिबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
यामुळे शेतकरी हवाल दिल झाला आहे. तर काही गावातील घरांचे नुकसान झाले आहे. सरकारने ताबडतोब अधिवेशन घेत नागरिकांना दिलासा देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा असे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी म्हटले आहे. राज्य भरातील धरणं जुलै महिन्यातच 65 टक्के भरली आहेत. यामुळे येणाऱ्या काळात ते ओव्हर फ्लो होताय का असा धोका असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. मात्र चिपळून रत्नागिरीमध्ये पाणी साचले नाही हे खूप चांगले झाले त्यासाठी आम्ही नद्यांमधील गाळ काढला होता.
मुख्यमंत्री शिंदेंनी कुठे दौरा करावा याबाबत आमचा विरोध नाही. मात्र जनता त्रासलेली असताना तातडीने निर्णय घेण्यासाठी अधिवेशन बोलावले पाहिजे असे म्हटले आहे. तर तिरुपती ला छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती असणारी गाडी जाऊ देत नाही यावर मिलीद नार्वेकर हे उद्या किंवा परवा जनतेशी संवाद साधतीलच, मात्र मुख्यमंत्र्यांनी ही यावर बोलायला हवे असे म्हणत अजित पवारांनी म्हटले आहे. बहुमत असताना मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही असा सवाल देखील अजित पवारांनी उपस्थित केला. हा राज्यातील जनतेचा अपमान आहे असे म्हणतांना अजित पवार म्हणाले की अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांचा आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे दुष्काळ जाहीर करत तातडीने उपाययोजना करायला हव्या.
दिल्लीच्या इशाऱ्यावर चालणारे सरकार
मागील सरकारच्या काळातील योजना थांबविण्याचे काम हे सरकार करत आहे. त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेंच सरकार चालवत आहे त्यांना कुणाला त्रास द्यायचा नाही की काय असा मिश्कील सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे. शिंदें – फडणवीसांना दिल्लीतून हिंरवा कंदील मिळाल्या शिवाय ते काहीच करू शकत नाही.
काही कामाच्या संदर्भात अर्जुन खोतकर हे खासगी कामाच्या निमित्ताने भेट घेतलीते कुठेही प्रवेश करणार नाही असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले म्हणजे त्यांच्यासोबत जाणार असे होत नाही. राष्ट्रवादीने तरुणाना संधी देण्याचे काम केले आहे. 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तरुणांना मोठ्या प्रमाणावर संधी देईल् असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.