महाराष्ट्र 24 – पिंपरी चिंचवड- आज राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड ओबीसी सेल ची बैठक पक्षाच्या खराळवाडी मधील मध्यवर्ती कार्यालयात पार पडली.महाराष्ट्रातील ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाल्यामुळे मा.अजित दादा पवार, मा. छगन भुजबळ व मा.जयंत पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.बैठकीचे प्रमुख पाहुणे म्हणून शहराध्यक्ष अजित गव्हाणे उपस्थित होते.बैठकीच्या अध्यक्षस्थानी ओबीसी सेल चे अध्यक्ष श्री.विजय लोखंडे , प्रदेश उपाध्यक्ष श्री.सतीश दरेकर व सौ सारिका पवार होते.
बैठकीत बोलताना होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आरक्षित जागांवर संधी देण्यात यावी असे मत श्री.विजय लोखंडे यांनी मांडले.सौ.सारिका पवार यांनी ओबीसींमधील सर्व घटकांना न्याय मिळावा असे मत मांडले. ओबीसी समाज एकजुटीने राष्ट्रवादी पक्ष सोबत राहील असा विश्वास श्री.सतीश दरेकर यांनी दिला.
ओबीसींना येत्या काळात योग्य न्याय दिला जाईल तसेच शहरात काम करताना त्यांना शहर राष्ट्रवादीकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असा विश्वास शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला
या प्रसंगी युवक अध्यक्ष इम्रान शेख ,पि.के.महाजन ,विशाल जाधव ,प्रदीप आहेर ,प्रकाश आल्हाट ,विशाल आहेर ,आनंदा कुदळे ,सतीश चोरमले ,महेश भागवत ,पुंडलिक सैंदाणे ,सोपान म्हेत्रे ,कविता ताई खराडे ,वंदना ताई जाधव ,सौ.वाघोले मॅडम ,सौ.माळी मॅडम व इतर अनेक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.