महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुलै । ”उद्या महाराष्ट्रात पुन्हा सत्ता परिवर्तन झाले तर यात आश्चर्य वाटून घेऊ नका. शिंदे गटातील काही आमदार अस्वस्थ आहेत, त्यांना फसवले गेले. तेच आमदार आता आमच्या संपर्कात आहेत त्यामुळे सत्तापरिवर्तन अटळ असेल.” असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज व्यक्त केला. ते माध्यमांशी बोलत होते.
पाचवेळा शिंदे दिल्ली दरबारात
राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या मनात खूप गोंधळ आहे शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री स्वतःला म्हणत असतील तर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जाण्याची गरज नसते. अमित शहासुद्धा मातोश्रीवर येत होते ते एक तेव्हाचे नाते होते. पण पाचवेळा मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जावे लागते ते त्यांचे बस्तान मुंबईत हलवतात की काय अशी स्थिती आहे.
आत्मचिंतनाची गरज
राऊत म्हणाले, महिना झाला तरी दोघांचेच कॅबीनेट असून ते बेकायदेशिर निर्णय घेत आहेत. त्यात महाराष्ट्र आणि शिंदे यांच्या गटाला काय मिळत आहे. शिवसेनेतून बाहेर पडून काय मिळवले याचे आत्मचिंतन करावे लागेल.
सोळा आमदार अपात्रच होणार
राऊत म्हणाले, सर्वोच्च न्यायालय कायद्यानुसार निर्णय देणार याची खात्री त्यामुळे सोळा आमदार अपात्र होतील. शिंदे गटाला पक्षात विलीन व्हावे लागेल. आमदार आमच्या संपर्कात असून भविष्यात पुन्हा एकदा सत्तापरिवर्तन झाले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.