महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुलै । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या राज्यात सत्तापरिवर्तन होणार, या वक्तव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत सत्तांतराचं स्वप्न पाहतायत, त्यांना स्वप्नातच राहू द्या, असं प्रत्युत्तर दिले आहे. तर उणीदुणी काढण्यापेक्षा पूरग्रस्तांना मदत करा, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राऊतांना लगावला आहे.
संजय राऊत यांनी शिंदे गटात गेलेले अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतर होईल, असं भाकीत केले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना प्रत्युत्तर देताना म्हटले, संजय राऊत यांना स्वप्नातच राहू द्या. एकनाथ शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.