टॅक्स रिटर्न भरण्यासाठी तुमच्याकडे ‘ही’ कागदपत्रे असणे आवश्यक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुलै । आयकर रिटर्न (आयटीआर) भरण्याची अंतिम मुदत दोन दिवसांत संपत आहे. मूल्यांकन वर्ष २०२२-२३ साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२ आहे. ई-फायलिंग पोर्टलद्वारे २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत चार कोटींहून अधिक रिटर्न भरले गेले आहेत. म्हणजेच अजूनही तब्ब्ल १.९० कोटी करदात्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरलेले नाही.

गेल्या दोन वेळेप्रमाणे यावेळीही आयटीआर भरण्याची मुदत वाढवण्याची चिन्हे दिसत नाही. तर प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे की, जर अद्याप रिटर्न भरले नसेल तर ते लवकरात लवकर भरा आणि दंडात्मक कारवाईपासून स्वतःला वाचवा.

फॉर्म-१६ सर्वात महत्वाचा
सर्व नोकरदार लोकांसाठी फॉर्म-१६ हा सर्वात महत्वाचा दस्तऐवज आहे, ज्याच्या मदतीने प्राप्तिकर रिटर्न दाखल केला जातो. हे दस्तऐवज प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या कंपनीच्या वतीने दिले जाते. यामध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातून कर कपातीची संपूर्ण माहिती तसेच दिलेल्या पगाराची माहिती आहे. प्रत्येक नियोक्त्याने (कंपनी) त्याच्या कर्मचाऱ्याला फॉर्म-१६ जरी करणे आवश्यक आहे.

फॉर्म २६ एएस मदत करेल

हा फॉर्म आयकर विभागाकडून जारी केला जातो, ज्यामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या उत्पन्नावर आकारल्या जाणार्‍या कराची संपूर्ण माहिती असते. आयकर विभागाच्या वेबसाइटवरून तुमचा पॅन क्रमांक टाकून तो काढला जाऊ शकतो. तुम्‍हाला हवं असल्‍यास तुम्‍ही तुमच्‍या फॉर्म-१६ आणि फॉर्म २६एएसची तुलना देखील करू शकता की दोन्ही ठिकाणी कर कपात समान आहे की नाही. गेल्या महिन्यात, सरकारने फॉर्म २६ एएसमध्ये काही सुधारणा देखील केल्या आहेत, ज्या अंतर्गत सर्व श्रेणींमध्ये माहिती दर्शविली आहे.

व्याज उत्पन्न प्रमाणपत्र
जर तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एफडी केली असेल किंवा इतर कोणत्याही व्याज देणार्‍या योजनेत पैसे जमा केले असतील, तर व्याज उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा बँक स्टेटमेंट ठेवणे आवश्यक आहे जेणेकरुन तुम्हाला तुमची फाइल करताना योग्य माहिती मिळू शकेल. तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम ८०टीटीए अंतर्गत १०,००० रुपयांपर्यंतच्या व्याजावर कर सूट मिळू शकते.

कर बचतीचा पुरावा
बरेच लोक कर वाचवण्यासाठी काही कर बचत गुंतवणूक करतात. ज्यांना ही कागदपत्रे त्यांच्या नियोक्त्याला निर्धारित वेळेत देता येत नाहीत, त्यांनी आयकर विवरणपत्र भरताना त्याचा पुरावा देणे आवश्यक आहे. हा कर बचत गुंतवणुकीचा पुरावा एलआयसी प्रीमियम पावती, पीपीएफ गुंतवणूक पासबुक, ईएलएसएस पुरावा, देणगी पावती, शिक्षण शुल्काची पावती इत्यादी असू शकते.

वैद्यकीय विमा दस्तऐवज
तुम्ही कलम ८०डी अंतर्गत रु. २५,००० पर्यंतच्या आरोग्य विमा प्रीमियमवर कर सूट मिळवू शकता. या विमा पॉलिसी तुमच्यासाठी, तुमच्या जोडीदारासाठी, मुलांसाठी असू शकतात. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला ५०,००० रुपयांपर्यंतच्या आरोग्य विमा प्रीमियमवर कर सूट मिळू शकते, त्यामुळे आयकर रिटर्न भरताना या सर्व पावत्या सोबत ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *