महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुलै । दिल्ली सरकारचं (Delhi Government) नवं उत्पादन शुल्क धोरण येऊन नऊ महिनेही झाले नाहीत, तोवर 200 हून अधिक दुकानं बंद झाली आहेत. तसंच पुढील काही दिवसांत आणखी काही दुकानंही बंद (Liquor Shops) होण्याची शक्यता आहे. किंबहुना, दिल्लीत दारूचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी सरकारच्या दारू धोरणापासून फारकत घेतली असून दुकानं बंद करण्यास सुरुवात केलीय.
यामागं दुकानदारांचं आर्थिक नुकसान हे प्रमुख कारण आहे. त्यामुळं दुकानदार त्यांचे परवाने सरकारला परत करत आहेत. येत्या काही दिवसांत दिल्लीत पुन्हा एकदा दारूबंदीवरून हाहाकार माजण्याची शक्यता आहे. आतापर्यंत दिल्लीतील 9 झोन उत्पादन शुल्क विभागाला शरण आले आहेत. म्हणजेच, 160 हून अधिक दुकानं बंद करण्यात आली आहेत.