Commonwealth Games 2022: महाराष्ट्राच्या सुपुत्राने इतिहास घडविला ; संकेत महादेव सरगरला ‘राष्ट्रकुल’मध्ये रौप्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुलै । सांगलीत छोटंस हॉटेल चालवणाऱ्या वडिलांचे डोळे आज अभिमानानं पाणावले. महाराष्ट्राचा सुपूत्र संकेत महादेव सरगर याने राष्ट्रकुल स्पर्धेत २०२२ भारताला पहिले पदक जिंकून दिले. संकेतने ५५ किलो वजनी गटात भल्याभल्यांना पाणी पाजले. संकेतच्या पदकापूर्वी भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये १२५ पदकांची कमाई केली होती आणि नेमबाजीनंतर ही सर्वोत्तम पदकसंख्या आहे. अखेरच्या प्रयत्नापर्यंत संकेत सुवर्णपदकाच्या शर्यतीत आघाडीवर होता, परंतु त्याचा हाताचा कोपरा दुखावला अन् त्याचा १३९ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न फसला. १ किलोच्या फरकाने प्रतिस्पर्धी खेळाडूने सुवर्णपदक जिंकले अन् संकेतला रौप्यवर समाधान मानावे लागले.

https://twitter.com/Media_SAI/status/1553311726221012992?s=20&t=Up01aNAM2BT4f6LQp9AWFg

श्रीलंकेच्या दिलंका इसुरू कुमार योदागेने स्नॅचमध्ये ( Snatch) पहिल्याच प्रयत्नात १०५ किलोचे लक्ष्य ठेवले होते आणि ते त्यांनी लिलया पेलले. पण, भारताचा संकेत आला अन् हवाच बदलून टाकली. त्याने पहिल्या प्रयत्नात १०७ किलो वजन उचलले. मलेशियाच्या बिन कॅस्डन मोहम्मद अनिकनेही १०७ किलो वजन उचलले. आता संकेतसमोर १११ किलोचे लक्ष्य होते. स्नॅचमध्ये भारतासमोर आता श्रीलंका व मलेशियन खेळाडूंचे आव्हान होते. संकेतने १११ किलोचे वजनही सहज उचलले. या कामगिरीसह संकेतने राष्ट्रकुल व राष्ट्रीय विक्रमही मोडला. मलेशियन खेळाडू दुसऱ्या प्रयत्नात अपयशी ठरला. स्नॅच प्रकारात ११३ किलो वजन उचलून संकेत अव्वल स्थानी राहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *