![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुलै । पुण्यातील (Pune) कासारसाई धरणाच्या कडलेला उभारण्यात आलेलं हवेतील तरंगत हॉटेल म्हणजे स्काय डायनिंग हॉटेल (Sky Dining Hotel) वादाचा भोवऱ्यात सापडलंय. स्काय डायनिंग हॉटेलच्या मालकाला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या हॉटेल मालकाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात पहिल्यांदाच सुरु झालेल्या या हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेण्याचं लोकांचे स्वप्न अधूरचं राहणार असल्याचे दिसत आहे.
आवश्यक असलेल्या परवानग्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नोटीसीद्वारे दिले आहेत. 120 फुटांवर जेवण्याची सोय करणे ही बाब अत्यंत धोकादायक असल्याचं पोलिसांनी दिलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या हॉटेल मालकाला नोटीस बजावली असून, सर्व परवानग्या जोपर्यंत घेतल्या जात नाहीत तोपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने हे हॉटेल सर्व परवानग्या मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी यासंदर्भात हॉटेल मालकाला नोटीस पाठवली आहे.