राऊतांच्या घरी सापडलेल्या दहा लाखांच्या कॅशवर शिंदेचं नाव, बंधू सुनील राऊतांचा आरोप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ ऑगस्ट । शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईडीने अखेर अटक केली. १२०० कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात सतरा तास झाडाझडती केल्यानंतर अंमलबजावणी संचलनालयाने (ED) राऊतांवर कारवाई केली. गेल्या अडीच वर्षात मोदी सरकारच्या विरोधात शिवसेनेची बाजू प्रखरपणे मांडून भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या संजय राऊत यांची ईडी कार्यालयात तब्बल आठ तास चौकशी झाली, त्यानंतर त्यांना जेरबंद करण्यात आलं. दरम्यान, सगळ्या बोगस केस कागदावर आणून खोट्या केसमध्ये संजय राऊत यांना अटक दाखवण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांचे बंधू आणि शिवसेना आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांनी भावाच्या अटकेनंतर पत्रकारांशी बोलताना दिली आहे. त्याचप्रमाण राऊतांच्या घरी सापडलेल्या दहा लाख रुपयांच्या रोख रकमेप्रकरणीही त्यांनी खळबळजनक माहिती दिली आहे.

मी संजय राऊत यांना भेटलो, ते ओके आहेत, बिनधास्त आहेत. त्यांना काही टेन्शन किंवा भीती नाही. दहा लाखांची जी कॅश सापडली, त्याच्यावर ज्यांनी ताबा घेतला, त्यावेळी लिहिलं होतं अयोध्या आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde). ते अयोध्याला गेले होते, त्याचं काँट्रिब्युशन होतं, ते पक्षाचे पैसे आहेत आणि पक्ष कार्यालयात जमा होणार होते. आम्ही न्यायालयीन लढाई लढणार. तुम्ही रामायण-महाभारत बघा, सत्याचाच विजय होतो. संजय राऊत यांना काही दिवसात न्याय मिळेल, भाजप राऊतांना घाबरली म्हणून अटक केली, असा गंभीर आरोपही सुनील राऊत यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *