महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑगस्ट । ‘रात्रभर याचा विचार मनात येतो. उद्धव साहेबांना सांभाळून घ्यायची वेळ होती, त्यावेळी तुम्ही निर्लज्जपणे निघून गेला. आम्ही डोळे बंद करून मिठी मारली पण पाठीत खंजीर खुपसला. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा मग बघू सत्य जिंकते की सत्ता जिंकते, असं म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचं नाव न आव्हान दिले..
‘चिपी विमानतळाचे काम आपण केले आहे. आता श्रेयवादासाठी आणि श्रेय घेण्यासाठी इकडून तिकडून कुणी तरी पुढे आले आहे. आपण कोकणासाठी अनेक काम केले निधी मंजूर केला. पण, त्या कामांना या बेकायदेशीर आणि गद्दारांच्या सरकारने स्थगिती दिली. पण, हे सरकार एक दीड महिन्यात कोसळणार आहे, हे लिहून घ्या, महाराष्ट्र अशी गद्दारी कधीच खपवून घेणार नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
महाराष्ट्रात दोन लोकांचं जम्बो मंत्रिमंडळ आहे. मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण आहे कळत नाही. यातील नेते कुणाला पंतप्रधान म्हणत आहे, काही समजत नाही. या लोकांना जनतेशी काही घेणंदेणं नाही. महाराष्ट्राने असं घाणेरेडं राजकारण कधी पाहिलं नाही. मी आज 32 वर्षांचा तरुण मुलगा आहे, मी आजोबांसोबत फिरलो, वडिलांसोबत फिरलोय, पण असं घाणरेडं राजकारण कधी पाहिलं. ज्या माणसाने तुम्हाला सगळं काही दिलं, मंत्रिपदं दिली, त्याच माणसाच्या पाठीत खंजीर खुपसलं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
या गटाचे आमदार फोडा, त्या गटाचे 20 आमदार फोडून जर अशी सरकार बनायला लागली तर कशी परिस्थिती होईल याचा विचार करा. महाराष्ट्राच्या विरोधात कारस्थाने सुरू आहेत त्याच्याकडे लक्ष नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
राज्यपालांनी मुंबईची ओळख पुसण्याचे काम केले आहे. मुंबई आणि ठाणे निवडणुका आहेत म्हणून राज्यपालांनी नावे घेतली. कोणत्याही समाजामध्ये भांडण नाही. लोकांमध्ये वाद नाही. पण त्यांच्यामध्ये वाद निर्माण केल्याचे काम केले जात आहे. सगळे चांगले सुरू असताना तुकडे पाडणारी लोक आली आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी राज्यपालांवर टीका केली.
ठाकरे परिवार समोर उभा आहे,संपू शकत नाही. महाराष्ट्राला संपवण्याचे राजकारण सुरू आहे, त्याला 40 निर्लज्ज गद्दार फसले. माझ्या मनात यांच्या बदल राग नाही. पण जे सोडून गेलेत त्यांच्या मनात द्वेष आहे हे दिसून येत आहे. आम्ही त्यांना सर्व दिले, वैयक्तिक पदं दिली, मंत्रिपदं दिली, सगळं काही दिलं. पण आमच्या पाठीत का खंजीर का खुपसला हा प्रश्न आजही मनात आहे. उद्धव साहेबांना सांभाळून घ्यायची वेळ होती, त्यावेळी तुम्ही निर्लज्जपणे निघून गेला. गरजेपेक्षा जास्त दिले याचे अपचन झाले आहे याचा राग असेल म्हणून पक्ष फोडत आहेत. तुम्हाला जायचे आहे तर जा दडपणे दूर करून खुश राहा. लाज असेल तर राजीनामा द्यावा आणि निवडून या, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.