महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑगस्ट ।महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतरही नेत्यांच्या मागे ईडीची पिडी अजूनही कायम आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक यांनी मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. आता पत्राचाळ प्रकरणात सुद्धा या एकाच गुन्ह्याखाली अटक, ईडीचे पत्रक आले समोरनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्यामुळे संजय राऊत यांची जेलवारी आता अटळ मानली जात आहे.
भाजपवर टीकेची एकही संधी न सोडणारे शिवसेनेची बुलंद तोफ संजय राऊत अखेरीस ईडीच्या जाळ्यात सापडले आहे. पत्राचाळ प्रकरणात चौकशी अंती अटक करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्री 12.02 वाजेच्या सुमारास राऊतांना अटक करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात आला आहे. याच गुन्ह्याखाली त्यांना अटक करण्यात आली असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे, याआधी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप झाला पण त्यांना मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. तर लकी कम्पाऊंड प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. त्यांच्यावर सुद्धा मनी लॉड्रिंगचा आरोप करण्यात आला आहे. मलिक आणि देशमुख हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. आता संजय राऊत यांना मनी लॉड्रिंग अॅक्ट 2003 [15 of 2003] नुसार अटक केली आहे.