महाराष्ट्र २४- ऑनलाईन । बीड । विशेष प्रतिनिधी । आकाश शेळके । कोरोना विषाणूचं मोठं संकट सध्या देशावर आहे. या संकटात आपले डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी एखाद्या सुपरहिरोप्रमाणे आपल्यासाठी लढत आहेत. मात्र, अशा परिस्थितही देशात या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असल्याच्या दुर्दैवी घटना पुढे येत आहेत. मात्र, आता केंद्रातील मोदी सरकारने वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांबाबत कठोर निर्णय घेतला आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना तीन महिने ते 7 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीत एक अध्यादेश पारित करण्यात आला. याअंतर्गत आता वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. यामध्ये तीन महिने ते 7 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांनी याबाबतची माहिती दिली.
Amendment to be made to Epidemic Diseases Act, 1897 and Ordinance will be implemented. Such crime will now be cognizable & non-bailable. Investigation will be done within 30 days. Accused can be sentenced from 3 months-5 yrs & penalised from Rs 50,000 upto Rs 2 Lakh: P Javadekar https://t.co/x3B5vjYZ8s
— ANI (@ANI) April 22, 2020
देशात अनेक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहेत. सरकार हे सहन करणार नाही. सरकारने याबाबत एक अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशाअंतर्गत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे, असं प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना जामीन मिळणार नाही
या अध्यादेशानुसार, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना जामीन मिळणार नाही आणि 30 दिवसांच्या आत या प्रकरणाचा तपास पूर्ण केला जाईल. एका वर्षाच्या आत यावर निर्णय सुनावण्यात येईल. या प्रकरणी दोषीला 3 महिने ते 5 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. त्याशिवाय, गंभीर प्रकरणांमध्ये 6 महिने ते 7 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. इतकंच नाही तर, गंभीर प्रकरणांमध्ये 50 हजार ते 2 लाखापर्यंतचा दंड आकारण्यात येईल. सरकारच्या अध्यादेशानुसार, जर कुठल्या वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या गाडीवर हल्ला करण्यात आला, तर त्या गाडीच्या बाजार मूल्याच्या दुप्पट भरपाई आकारली जाईल, असं जावडेकरांनी सांगितलं.
देशात सध्या 723 कोविड रुग्णालयं आहेत, ज्यामध्ये 2 लाख बेड सज्ज आहेत. यापैकी 24 हजार हे अतिदक्षता विभागातील बेड आहेत. सध्या देशात 12 हजार 190 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. आपल्याकडे 25 लाखापेक्षा जास्त एन-95 मास्क देखील आहे, तर 2.5 कोटी अतिरिक्त मास्कचा ऑर्डर देण्यात आला आहे, अशी माहिती जावडेकर यांनी दिली.