Political : विस्तार लांबनीवर ; मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावली शिंदेगटाची बैठक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑगस्ट । मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुरुवारी अचानक अस्वस्थता जाणवू लागल्यामुळे डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली. त्यानंतर, डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे, त्यांच्या सर्वच प्रशासकीय बैठका आणि पूर्वनियोजित दौरेही रद्द करण्यात आले आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांचे दौऱ्यावर दौरे सुरू असून दिल्लीवारी, महाराष्ट्रात मेळावे आणि पूरग्रस्त भागांची पाहणी सुरूच होती. त्यातूनच ताण आल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त आहे. मात्र, आता प्रकृती अस्वस्थता असतानाही आज ते शिंदे गटातील 50 आमदारांची बैठक घेणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ते गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी ११ ला, तर राज्यातील पीकपाणी परिस्थितीबाबत दुपारी १ ला बैठक घेणार होते. पण या दोन्ही बैठका मुख्यमंत्र्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रद्द करण्यात आल्या. त्यांनी नंदनवन या शासकीय बंगल्यावर आराम केला. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी दुपारीच दिल्लीला रवाना झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *