राज्यात करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला; आरोग्यमंत्री राजेश टोपे

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 ।मुंबई: राज्यात करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनामार्फत करोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. त्यामुळे राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाइन वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला देण्यात आल्या आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालये यांचा वापर करण्यात येणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील करोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर आणण्यात यश मिळाल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

करोनाशी लढताना आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे. चाचण्या केल्या जात आहेत, सर्वेक्षण होत आहे. आयसोलेशन आणि क्वारंटाइन केले जात आहे. जर समजा कुठलीच उपाययोजना केली नाही तर काय होईल यासाठी गणितीय गृहितकावर आधारित रुग्णसंख्येची माहिती समाजमाध्यमांवर फिरत आहे. मात्र महाराष्ट्रात ज्या पद्धतीने कार्यवाही होत आहे. रुग्ण दुपटीचा दर सात दिवसांवर गेलाय त्यामुळे राज्यातील चित्र आशादायी आहे. लोकांनी घाबरू नये, अशा शब्दांत टोपेंनी आश्वस्त केले. आरोग्यमंत्री टोपे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यात त्यांनी महत्त्वाचा तपशील दिला. खबर नसल्याचे सत्य समोर आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *