महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑगस्ट । अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी छोटा शकील याने प्रथमच राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबईतील डी कंपनी आणि त्याच्या जवळच्या साथीदारांच्या ठिकाणांवर केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. देशातील आघाडीचा न्यूज चॅनल न्यूज 18 चे वरिष्ठ वार्ताहर तिवारी यांच्याशी खास बातचीत करताना छोटा शकीलने ही प्रतिक्रिया दिली.
दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचे कुटुंब मुंबईत राहते. त्यांच्या ठावठिकाणाबाबत एजन्सी गप्प बसली होती आणि नवाब मलिक आणि अंडरवर्ल्डचे काय संबंध आहेत याचे प्रामाणिकपणे उत्तर द्यावे? ईडीने त्यांना अटक केली. त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप आरोपपत्रात करण्यात आला आहे.
छोटा शकील : नवाब मलिकांचं प्रकरण मीदेखील वृत्तपत्रांमध्येच वाचलं आहे. त्यांच्या लिंक्स आहेत का, त्यांनी कोणता प्लॉट खरेदी केला, याच्याशी आम्हाला काही घेणं-देणं नाही. हे प्रकरण आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. आम्हाला हे प्रकरण मीडियामधून समजलं. मात्र, प्रत्येक गोष्ट दाऊद भाईपर्यंत पोहोचणं आणि त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देणं, गरजेचं नाही. आमच्यासाठी ही क्षुल्लक बाब आहे. आम्ही टेन्शन घेत नाही.