महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । सलमान मुल्ला। दि. ५ ऑगस्ट । कळंब:- तालुक्यातील दाभा ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आली असून सात पैकी सहा जागेवर भारतीय जनता पार्टी चे उमेदवार विजयी झालेले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याचे नेते तथा तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब तालुक्यातील दाभा ग्रामपंचायतीवर सात पैकी सहा उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला.
विजयी उमेदवारांचा सत्कार भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कळंब कार्यालयात भाजपा तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित सदस्य अशोक शिवाजी टेळे, सौ.हेमा प्रकाश टेळे,साहेबराव रंगनाथ लोंढे,सौ.राजामती बब्रुवान जाधव,सौ.मनीषा अशोक साबळे,सौ.शशिकला तात्यासाहेब टेळे यांच्यासह पॅनलमधील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संदीप भैय्या बावीकर,सुधीर बिक्कड यांच्यासह दाभा गावातील नागरिक,भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.