Horoscope Today ; ‘या’ राशींना आज दिवस आनंददायी ; पहा आजचे राशिभविष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट ।

मेष
आज दिवस मनाप्रमाणे घालवाल. जवळच्या मित्रांची गाठ पडेल. सामाजिक जाणीव ठेवून वागाल. एखादे जुने स्वप्न पूर्ण होईल. सकारात्मक विचारातून यशस्वी व्हाल.

वृषभ
आज मित्रांची बाजू जाणून घ्यावी. मानसिक चंचलता जाणवेल. समतोल विचार करून पहावा. जोडीदाराकडून सहकार्याची अपेक्षा ठेवाल. अति चिकित्सा करू नका.

मिथुन
आज काही गोष्टींचे चिंतन करावे लागेल. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. सामाजिक प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. प्रगतीचा मार्ग खुला होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

कर्क
आज मोहाला बळी पडू नका. जोडीदाराविषयी मनात शंका बाळगू नका. गोड बोलून कामे करून घ्यावीत. मुलांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी. कामाचा वेग वाढेल.

सिंह
आज आशादायक ग्रहमान राहील. कामाचा जास्त बोजा घेऊ नका. वरिष्ठांची कौतुकाची थाप पडेल. दिनक्रम व्यस्त राहील. हाती घेतलेले काम तडीस न्याल.

कन्या
आज व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध होईल. काही कामे कमी श्रमात पार पडतील. जोडीदार तुमच्यावर नाराज होऊ शकतो. रेस-जुगारातून लाभ संभवतो. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल.

तूळ
आज अति उत्साहावर नियंत्रण ठेवा. भागीदाराशी सुयोग्य चर्चा कराल. अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. विरोधकांचा रोष मावळेल.

वृश्चिक
आज आराम करण्याची इच्छा निर्माण होईल. प्रिय व्यक्तीची नाराजी दूर होईल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल. कामातून समाधान लाभेल. नसती काळजी करू नका.

धनू
आज दिवस प्रसन्नतेत उगवेल. काही जुने प्रश्न मार्गी लागतील. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. मुलांबरोबर अधिक वेळ घालवाल. छंद जोपासण्यासाठी वेळ काढा.

मकर
आज व्यायामात आळस करू नका. घरातील वातावरण खेळते राहील. दिवस मजेत जाईल. जोडीदाराच्या उत्पन्नात वाढ होईल. घरात तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.

कुंभ
आज ग्रहमानाची अनुकूलता लाभेल. भावंडांची मदत मिळेल. कोणालाही दुरूत्तर करू नका. मानसिक चंचलता टाळावी. प्रेमसंबंध घट्ट करण्याचा प्रयत्न करावा.

मीन
आज नवीन संकल्पना कृतीत उतरवा. कौटुंबिक कामात वेळ जाईल. बागकामाची आवड जोपासाल. उतावीळपणा करू नये. मित्र मंडळींचे सहकार्य घ्याल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *