Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी तर कमालच केली ! थेट ‘उद्धव ठाकरे गट’ करुन टाकलं

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑगस्ट । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख टाळला होता, आता एक पाऊल पुढे जात पक्षाला ‘उद्धव ठाकरे गट’ करुन टाकलं. ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर करताना स्वतःच्या शिंदे गटाला त्यांनी शिवसेना असं संबोधलं, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ‘उद्धव ठाकरे गट’ म्हणून डिवचलं. त्यामुळे ही लढाई आणखी किती लांबवर जाणार, हे सांगता येणं कठीण आहे.

https://twitter.com/mieknathshinde/status/1555804114080083968?s=20&t=rcek-htOFiZAk3CjWW_RPA

एकनाथ शिंदेंचं ट्वीट

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती सरकारला जनतेचा कौल मिळाला आहे. शिवसेना-भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन. तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना-भाजपा युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारराजाचेही अभिनंदन व आभार, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये एक पोस्टरही शेअर केलं आहे. या पोस्टरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो आहेत. राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या निकालाची आकडेवारी देताना एकनाथ शिंदेंनी भाजपाला ८२, शिवसेना ४०, उद्धव ठाकरे गट २७, राष्ट्रवादी काँग्रेस ५३, काँग्रेस २२ आणि इतरांना ४७ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाल्याचं म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *