आम्ही दोघे आहोत… आम्ही दोघे आहोत. अरे पण दोघे पुरू शकतात का ?अजितदादांनी उडवली शिंदे-फडणवीसांची खिल्ली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑगस्ट । राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पुन्हा टीका केली. प्रत्येक वेळी आमचा मीडिया मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारतो विस्तार कधी? तर लवकर, लवकर, लवकरच… अशी विनोदी ॲक्शन केली. आणि तुम्ही दोघे सगळे निर्णय घेण्यासाठी पुरणार आहात का? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. त्याचसोबत जोपर्यंत दिल्लीवरून सिग्नल येत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, अशी मिश्किल टीका अजित पवार यांनी केली. पुण्यात आज सोमवार पेठ येथे राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष सचिन शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळेस ते बोलत होते.

शिंदे-फडणवीस सरकार राज्यात स्थापन होऊन मोठा काळ उलटला. पण आजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला नाही. या मुद्द्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरत आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज मंत्रिमंडळ विस्तारावरून पुन्हा टीका केली. महिनाभर झाला अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. प्रत्येक वेळी मीडिया त्यांना विचारते की विस्तार कधी, विस्तर कधी एकनाथराव आणि उपमुख्यमंत्री फडणवीस बोलतात “लवकरच, लवकरच… लवकरच होईल, अरे कधी होईल?, असं म्हणत अजितदादांनी विनोदी ॲक्शन सभेत एकच हशा पिकला.

एवढ्या मोठ्या महाराष्ट्रमध्ये चांद्यापासून ते बांधापर्यंत एवढे प्रश्न निर्माण होतात, अतिवृष्टी होते, वेगवेगळे संकटे येतात, वेगवेगळी घटना निर्माण होतात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. आता ऍडमिशन सुरू झाले आहे. त्याच्याबद्दल पालकांच्या मनात विद्यार्थ्यांच्या पुढचे काही प्रश्न आहेत? ते घेणार कोण. आम्ही दोघे आहोत… आम्ही दोघे आहोत. अरे पण दोघे पुरू शकतात का? याचं तरी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करा. मला टीका करायची नाही. पण याचा मोठा फटका आपल्या महाराष्ट्र बसतोय, असं अजित पवार पुढे म्हणाले.

दरम्यान, यांच्या हातात काही नाही. दिल्लीतून ज्यावेळेस सिग्नल मिळेल, त्या वेळेस यांचा विस्तार होणार आहे. यांच्या हातात काही नाही, असंही अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *