मोफत शिक्षण देऊन मी चुकीचं काम करतोय का ? केजरीवालांचा गुजरातमधून थेट सवाल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑगस्ट । मागील काही दिवसांपासून देशात रेवाडी संस्कृती अर्थात रेवड्या देऊन मत घेण्याचा प्रकार वाढल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरवाल यांच्यावर टीका केली होते. नागरिकांना मोफत सुविधा देण्याच्या घोषणांचं प्रकरण न्यायालयातही गेले होतं. यावरून आता अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये जाऊन खोचक टीका केली आहे. (Arvind Kejriwal news in Marathi)

केजरीवाल म्हणाले की, आजकाल ‘फ्री रेवडी’ बद्दल खूप चर्चा होतेय. आम्ही दिल्लीच्या सरकारी शाळांचा कायापालट केला आहे. यंदा शेकडो विद्यार्थ्यांनी आयआयटी आणि एनईईटी परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. विद्यार्थी खणखणीत इंग्रजी बोलतात. मोफत शिक्षण देऊन मी चूक करत आहे का? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवरून केला.

निवडणुकीदरम्यान मोफत वीज, पाणी किंवा अन्य सुविधा देण्याचे आश्वासन देण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका दाखवली आहे. निवडणुकीदरम्यान ‘मोफत रेवाडी’ वाटण्याचे आश्वासन देणाऱ्या राजकीय पक्षांना रोखण्यासाठी केंद्र सरकारला तोडगा काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

निवडणुकीच्या काळात ‘रेवाडी संस्कृती’ संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, फुकटची आश्वासने देणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करून निवडणूक चिन्ह जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने वरील आदेश दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *