Saamana Editorial Sanjay Raut : संजय राऊत जेलमधून लिहतात ते काय स्वातत्र्यसेनानी नाहीत ; मनसेची शंका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ ऑगस्ट । मागच्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. दरम्यान त्यांच्या अटकेनंतर राज्यातील घडामोडींना वेग आला. शिवसेना पक्ष प्रमुख यांनी सामना मुखपत्राची जबाबदारी घेत भाजपवर निशाणा साधण्याचे ठरवले. परंतु सामनातून रोज अग्रलेख येतो तो कोण लिहत आहे यावर आता राजकारण सुरू झाले आहे. मनसेकडून सामनाच्या रोखठोक अग्रलेखावर टीका करण्यात आले आहे.

आज सामनामध्ये संजय राऊत यांच रोखठोक हे सदर आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी नाहीत की त्यांना जेल मधून लेखनाची परवानगी मिळावी की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत? का असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. यामुळे त्यांनी केलेल्या टिकेला आता शिवसैनिक काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लागून राहिले आहे.

संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत वाढ होण्याची शक्यता

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने 31 तारखेला रात्री उशीरा अटक केली होती. यानंतर 1 ऑगस्टला संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात आले. यानंतर ईडीकडून 8 ऑगस्टपर्यंत संजय राऊत यांची कोठडी मागितली होती. मात्र न्यायाधीश एम. जी.देशपांडे यांनी एवढ्या कोठडीची गरज नसल्याचे म्हणत 4 ऑगस्टपर्यंतच ईडी कोठडी सुनावणी होती.

त्यांची ईडी कोठडी संपली. त्यानंतर त्यांना पुन्हा विशेष PMLA कोर्टात हजर करण्यात आले. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने 10 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी वाढवून मागितली होती. काही जणांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे, त्यामुळे संजय राऊत यांची कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *