Bank Holidays : बँकेतील कामं करण्याचं नियोजन करताय ?ऑगस्ट महिन्यातील बँक हॉलिडेंची यादी पाहा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ ऑगस्ट । येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही बँकेतील कामं करण्याचं नियोजन करत असाल, तर एकदा बँकांच्या सुट्ट्यांची (Bank Holiday) यादी पाहून घ्या. काही राज्यांमध्ये आजपासून सलग तीन दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे तुम्ही घरातून बाहेर पडण्याआधी बँकांच्या सुट्ट्यांची यादी पाहून घ्या. ऑगस्ट महिन्यामध्ये बँकांना (Bank Holiday) अनेक सुट्ट्या आहेत. आरबीआयच्या कॅलेंडरनुसार देशातील विविध राज्यांमध्ये एकूण 18 दिवस बँकांना सुट्टी असेल. हे 18 दिवस सर्व राज्यांतील बँका बंद नसतील. ठराविक राज्यांतील बँकांना सुट्टी असेल.

07 ऑगस्ट 2022 : पहिला रविवार
08 ऑगस्ट 2022 : मोहरम (फक्त जम्मू आणि काश्मिरमधील बँका बंद)
09 ऑगस्ट 2022 : मोहरम (मुंबई, नागपूर, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, लखनौ, बंगळुरु, हैदराबाद, भोपाळ, जयपूर, कानपूर, पाटणा, रायपूर, अहमदाबाद, अगरतळा, ऐझॉल, रांचीमध्ये बँका बंद)

ऑगस्ट 2022 मधील बँकेच्या सुट्ट्यांची यादी

11 ऑगस्ट – रक्षाबंधन (सर्व राज्यांमध्ये बँका बंद)
12 ऑगस्ट – रक्षा बंधन (कानपूर, लखनौमध्ये बँकाना सुट्टी)
13 ऑगस्ट – दुसरा शनिवार सुट्टी
14 ऑगस्ट – रविवार साप्ताहिक सुट्टी
15 ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन (राष्ट्रीय सुट्टी)
16 ऑगस्ट – पारशी नववर्ष (मुंबई, नागपूर येथे बँक हॉलिडे)
18 ऑगस्ट – जन्माष्टमी
19 ऑगस्ट – जन्माष्टमी श्रावण वद-८/कृष्ण जयंती (अहमदाबाद, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, गंगटोक, जयपूर, जम्मू, गटना, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर येथे बँका बंद)
20 ऑगस्ट – कृष्णा अष्टमी (हैदराबादमध्ये बँका बंद राहतील)
21 ऑगस्ट – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
27 ऑगस्ट – चौथा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
28 ऑगस्ट – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
29 ऑगस्ट – श्रीमंत शंकरदेव तारीख (गुवाहाटीमध्ये बँक बंद)
31 ऑगस्ट – गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये बँकाना सुट्टी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link