महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑगस्ट । एक हजार कोटींहून अधिक रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना 31 जुलैला मध्यरात्री अटक केली. त्यांना आज तिसऱ्यांदा पीएमएलए कोर्टात हजर करण्यात येणार आहे. राऊत यांची आज ईडीकडे असलेली कोठडी संपणार आहे. त्यामुळे आता त्यांना पुन्हा ईडीची कोठडी मिळणार की, न्यायालयीन कोठडी हे स्पष्ट होईल.
कोठडीदरम्यान काय झाले?
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांची ईडीकडे चौकशी करण्यात आली.
वर्षा राऊत यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी
राऊतांच्या पत्नीकडून अनोळखी व्यक्तीकडून पैसे मिळाले. त्यामुळे वर्षा राऊत यांच्या सर्व खात्यांची चौकशी केली गेली.
वर्षा राऊत यांच्या खात्यात कोट्यावधींचे ट्रान्झेक्शन झाले त्याचे धागेदोरेही ईडीकडून तपासणी
ईडी तिसऱ्यांदा कोठडी मागणार
गेल्या चार दिवसांत ईडीने संजय राऊतांची चौकशी झाली. त्यादरम्यानईडीला अनेक गोष्टी पुढे आल्या. त्यामुळे ईडीने आता राऊतांच्या कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी ईडी न्यायालयात करणार आहे. तिसऱ्यांदा राऊत यांना ईडीचे अधिकारी कोठडी न्यायालयाकडे मागणार आहेत.
आधी पोलिस कोठडी मिळाल्यानंतर काय झाले?
अलिबागमधील जमीन खरेदीसाठी राऊतांनी 3 कोटी वापरले.
राऊतांनी अलीबागमध्ये 10 प्लाॅट खरेदी केली होती.
ईडीने दोन छापे मुंबईत टाकले तेव्हा ‘एचडीआयएल’ कंपनीचे आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या व्यक्तींचा ईडीने जबाब नोंदवला.
या कंपनीच्या संबंधित दुसऱ्या व्यक्तीच्या घरीही ईडीने छापे टाकले होते त्यातून बरीच माहिती ईडीने गोळा केली आहे.
संजय राऊत यांना न्यायालयाने सोमवारी चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती.
राऊतांची ईडीसमोर चौकशी झाली पण ही चौकशी रात्री करण्यात आली नाही.
चौकशीदरम्यान राऊतांजवळ काही अंतर राखून त्यांच्या वकीलांनी थांबण्याची मुभा होती.
ईडीने चार दिवसांत राऊतांविरोधातील प्रबळ पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी 4 ऑगस्टला न्यायालयात सुनावणी झाली. ईडी कोठडीत काही त्रास झाला आहे का असे राऊतांना कोर्टाने विचारले असता राऊत म्हणाले की, मला ज्या ठिकाणी ठेवण्यात आले त्या ठिकाणी योग्य व्हेटिंलेश नाही असा आरोप राऊतांनी ईडीवर केला आहे. तर संजय राऊतांना आम्ही एसीमध्ये ठेवण्याचा दावा ईडीने केला आहे. यानंतर कोर्टाने ईडीला फटकार लगावली.
संजय राऊत यांच्याकडे सर्व पैसा हा वैध मार्गांने आला आहे, त्यांच्यावर खोटी केस दाखल करण्यात आली आहे, तसेच संजय राऊत हे हार्ट पेशंट आहेत त्यामुळे त्यांना कमी दिवसांची रिमांड द्यावी अशी मागणी संजय राऊत यांच्या वकिलाने न्यायालयात केली होती.