Rain : राज्यात आजपासून ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑगस्ट । मुंबईमध्ये रविवारचा संपूर्ण दिवस मुंबई उपनगरे, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाची संततधार होती. उपनगरांमध्ये काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस मुंबईकरांनी अनुभवला. त्या तुलनेत पश्चिमेकडे अंधेरीपासून चर्चगेटपर्यंत पुढे तर पूर्वेकडे विक्रोळीपासून कुलाब्यापर्यंत फारसा पाऊस नव्हता. नवी मुंबईमध्येही काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. रविवारी दिलेल्या अद्ययावत इशाऱ्यानुसार सोमवार ते बुधवार या कालावधीत मुंबईला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे, तर सोमवारसाठी रायगड आणि रत्नागिरीला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. पुणे आणि सातारा येथेही घाट परिसरात अतितीव्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मान्सून ट्रफ दक्षिणेकडे असल्याने तसेच बंगाल, ओरिसा व उत्तर आंध्रप्रदेश किनारपट्टीसमोरील चक्रीय वाऱ्याची स्थिती, यातून त्याच ठिकाणी तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या क्षेत्राची रविवारी तीव्रता वाढली. हे क्षेत्र पश्चिम दिशेकडे म्हणजे ओरिसा, झारखंड, छत्तीसगड जवळील मध्य प्रदेशपर्यंतच्या भूभागावर सरकण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीसमोर तयार होणाऱ्या तटीय कमी दाब क्षेत्र पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.

राज्याला गुरुवारपर्यंत इशारा

– पालघर, ठाणे येथे सोमवार ते गुरुवार या कालावधीत ऑरेंज अॅलर्ट

– मुंबईमध्ये सोमवार ते बुधवार या कालावधीत ऑरेंज अॅलर्ट

– रायगड, रत्नागिरीत सोमवारी काही ठिकाणी अतितीव्र मुसळधार सरींची शक्यता त्यानंतर गुरुवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट

– सिंधुदुर्गात सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज

 

काही ठिकाणी पावसाचा जोर

– कुलाबा येथे सकाळी ८.३० पासून ७.४ मिलीमीटर, तर सांताक्रूझ येथे ६.४ मिलीमीटर पाऊस

– उपनगरांमध्ये दुपारपासून काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात

– चिंचोली अग्निशमन दल केंद्र येथे सायं. ५.३०पर्यंतच्या १२ तासांमध्ये ५७.६ दिंडोशी येथे ५८.१, दहिसर अग्निशमन दल केंद्र येथे २१.८, प्रबोधनकार नाट्यमंदिर येथे ३३.७, भांडुप कॉम्प्लेक्स येथे ५०.२, मुलुंड अग्निशमन दल केंद्र येथे २२.३, ऐरोली येथे ४१.४, कोपरखैरणे येथे ५९.९, वाशी येथे ६७.४, सानपाडा येथे ९७.४, जुईनगर येथे ७९.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

पाऊसस्थिती

– रत्नागिरीमध्ये रविवारी जगबुडी, वसिष्ठी, काजळी या नद्या इशारा पातळीच्या वर वाहत होत्या

– काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता

– राज्याचा दक्षिण किनारा आणि गोवा येथील मच्छिमारांना ११ ऑगस्टपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *