महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । पुणे । भारतात कोरोना विषाणूचे रुग्ण सतत वाढत आहेत. गुरुवारी देशात कोरोना विषाणूची एकूण संख्या 21 हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, या महामारीमुळे आतापर्यंत 681 लोकांचा बळी गेला आहे. तर देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 21393 वर पोहोचली आहे.
आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना विषाणूच्या घटनांची स्थिती खालीलप्रमाणे आहेः
आतापर्यंतचे एकूण रुग्ण – 21393
आजपर्यत पोझेटीव्ह रुग्ण – 16454
मृत्यू – 681
बरे झाले – 4258