महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । गेल्या महिन्यापासून रखडेला शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज होणार आहे. (Maharashtra Cabinet Expansion) तब्बल 39 दिवसानंतर सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळाला आहे. शिंदे गट आणि भाजपकडून भावी मंत्र्यांना निरोप देण्यात आले आहे. पण, प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळणारे दीपक केसरकर यांना अजूनही निरोप नसल्याची माहिती समोर आली आहे.
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आता काही तास उरले आहे. इच्छुक आमदार हे मुंबईत दाखल झाले आहे. सकाळी ११ वाजता या भावी मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पण, शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर प्रवक्तेपदाची जबाबदारी दीपक केसरकर यांनी आपल्या खांद्यावर घेतली. पण, केसरकरांना अजूनही निरोप नसल्याची माहिती समोर आली आहे.
मध्यंतरी केसरकर आणि राणे वाद उफाळून आला होता. केसरकर यांनी नारायण राणे यांच्यावर सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून गंभीर आरोप केला होता. राणे यांनीच आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते, याबद्दल पंतप्रधान मोदींकडे तक्रार केल्याचं केसरकरांनी सांगितलं होतं. त्यांच्या विधानामुळे भाजप आणि शिंदे गटात वाद चिघळला होता. नितेश राणेंनी फडणवीसांकडे तक्रार केली होती, त्यानंतर केसरकरांनी माघार घेतली.