आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा तूर्त स्थगित ; समोर आलं मोठं कारण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा तूर्त स्थगित करण्यात आली आहे. या यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात आदित्य ठाकरे जळगाव आणि नाशिकच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र ते आजारी असल्याने हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यभरातील संघटना अधिक मजबूत करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बैठका आणि मेळाव्यांचा धडाका लावला आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसंवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा आज, बुधवार, ९ आणि उद्या, १० ऑगस्ट रोजी जळगाव, मालेगाव, नाशिक आणि भिवंडी ग्रामीणमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र, हा दौरा स्थगित करण्यात आला आहे.

दरम्यान, त्यांची करोना चाचणी केली असता, ती निगेटिव्ह आली आहे. हा दौरा स्थगित झाल्याने आदित्य यांनी जळगाव, मालेगाव, नाशिक, आणि भिवंडीकरांची दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच लवकरच दौऱ्याच्या नवीन तारखा जाहीर करण्यात येतील, असेही सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *