महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं वयाच्या ६५व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर चाहते तर हळहळलेच. अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना आदरांजली वाहिली. कलाकारांपासून ते अगदी सर्वसामान्यांपर्यंत सोशल मीडियावर त्यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
एका चाहत्यानं त्यांच्या मोरूची मावशी नाटकातला डान्स शेअर केला आहे. खरं तर मोरूची मावशी नाटकातला विजय चव्हाण यांचा टांग टिंग टिंगा हा डान्स आणि गाणं जितकं लोकप्रिय होतं, तितकंच आवडतं होतं प्रदीप पटवर्धन यांचं नृत्य. ही पोरगी नाहीच तसली, हुंडी लाखाची असली हे गाणं आणि त्यावरचा प्रदीप पटवर्धन यांचा डान्स खूपच लोकप्रिय झाला होता.
https://www.instagram.com/lsuyog9797/?utm_source=ig_embed&ig_rid=9a9ca653-b5b6-426a-8d60-5e1105bdc132