मालेगाव बनला कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ , पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 110 वर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मालेगाव : मालेगावात कोरोना विषाणूचं थैमान सुरूच आहे. गुरुवारी दुपारपर्यत 14 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यात 6 पुरुष तर 3 महिलांचा सामावेश आहे. सकाळी 5 आणि दुपारी 9 असे एका दिवसात कोरोनाचे 14 रुग्ण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मालेगावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे. एकट्या मालेगावात कोरोनाने 9 जणांचा बळी घेतला आहे, अशी माहिती सामान्य रुग्णलायतील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी योगेश पाटील यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगावात आतापर्यंत कोरोनाचे 110 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नाशकात 10 पॉझिटिव्ह तर ग्रामीण भागात 4 पॉझिटिव्ह आहेत. मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. नागरिकांमध्ये भीती आहे. मात्र, कोणीही गांभीर्याने घेण्यात तयार नाही. दररोज मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत आहेत. आता तर प्रशासनही हतबल झाले आहे. वेळीच कठोर पावलं उचलली नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मालेगावात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. आतापर्यंत मालेगाव शहरात कोरोनाबाधित रुग्णांनी शंभरी गाठली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात मालेगाव शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल आहे. तरी देखील कोरोना या प्राणघातक रोगाला कोणीही गांभीर्याने घेण्यास तयार नाही. दररोज मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडून बाजारात गर्दी करत आहेत. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन कमी पडत आहे. तर दुसरीकडे ज्यांच्यावर नागरिकांमध्ये कोरोना हा किती घातक आहे, याची जाणीव करून देण्याची जबाबदारी आहे. असे आजीमाजी लोकप्रतिनिधीनी जनतेला वाऱ्यावर सोडत किरकोळ कारणावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतले आहेत. त्यामुळे आता जर सर्वांनी मिळून कठोर पाऊल उचललं नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही.

लॉकडाऊनचं उल्लंघन… मालेगाव शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होणास स्थानिक नागरिक कारणीभूत ठरत आहेत. शहरात लॉकडाऊनचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची धावपळ होत असून एकूण 400 जणांची पथके तैनात करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *