महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑगस्ट । पुढच्या मंत्रीमंडळ विस्तारात तुमचे नाव राहिलं, असे आश्वासनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले असल्याची माहिती प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu ) यांनी दिली. राजकारणामध्ये कभी खुशी कभी गम हे सुरुच असते. राजकारणात योग्य वेळी योग्य घाव मारावाच लागतो असेही कडू म्हणाले. मंत्रीमंडळ विस्तारात संधी मिळाली नाही याची मला खंत असल्याचे देखील कडू यावेळी म्हणाले. पहिल्या पंक्तीत बसवलं असतं तर आमचा सन्मान अधिक वाढला असता असेही यावेळी कडू यांनी सांगितले.
मंत्रींमडळात स्थान न दिल्यामुळं मी फार नाराज आहे असे नाही. पण मला खंत असल्याचे कडू यावेळी म्हणाले. मंत्री हा विषय माझ्यासाटी महत्वाचा नसल्याचेही कडू म्हणाले. राज्यात अपंग कल्याण मंत्रालय स्थापन करावं यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. पुढचा मंत्रीमंडळ सप्टेंबरमध्ये होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचे बच्चू कडू म्हणाले. हुद्दा महत्वाचा नाही तर मुद्दा महत्वाचा असल्याचंही ते म्हणाले. मुद्दा नसेल तर हुद्द्याला काही किंमत नसते असेही कडू म्हणाले.