युनिव्हर्सल चार्जर: सर्व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठी एकच चार्जर बनवण्याची तयारी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । केंद्र सरकार सर्व युनिव्हर्सल चार्जर स्वीकारण्यासाठी नवे नियम तयार करणार आहे. त्यानुसार फोन, लॅपटॉप, टॅब्लेट, ब्ल्यूटूथ, इअरफोन आणि इतर पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठी एकसारखे चार्जर तयार करावे लागतील. युरोपीय संघटनेने या वर्षाच्या सुरुवातीस युनिव्हर्सल चार्जर अनिवार्य केले आहे, ज्यात सर्व कंपन्यांना स्मार्टफोन आणि टॅब्लेट यांसारख्या सर्व उपकरणांत यूएसबी टाइपनोंसी पोर्ट तयार करणे अनिवार्य आहे.

ईनोंकचरा कमी करणे हा नव्या नियमाचा उद्देश आहे. मिळालेल्या वृत्तांनुसार, भारत सरकार अशाच प्रकारचे नियम स्वीकारण्याची शक्यता पडताळून पाहत आहे. सरकारने स्मार्टफोन निर्माते आणि इतर उद्योग संघटनांशी नियमांवर चर्चा करण्यासाठी १७ ऑगस्टला बैठक बोलावली आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, जर कंपन्या युरोप आणि अमेरिकेत युनिव्हर्सल चार्जर देऊ शकतात, तर मग त्या भारतात का देऊ शकत नाहीत? स्मार्टफोन आणि टॅब्लेटसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांत एकसमान चार्जर असावे.

२०२४ पासून युनिव्हर्सल चार्जर द्यावे लागतील : युरोपियन संघ

चार्ज होणारे लहान इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस तयार करणाऱ्या कंपन्यांना २०२४ पासून यूएसबी टाइपनोंसी पोर्ट असलेले चार्जरच द्यावे लागतील, अशी घोषणा युरोपीय संघटनेने केली होती. ‘अॅपल’ने त्याला विरोध करताना म्हटले होते की, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे प्रचंड ढिगारे निर्माण होतील. अॅपल आपल्या आयफोन्स, एअरपॉड्स यांसारख्या उपकरणांसाठी लाइटनिंग कनेक्टरचा वापर करते. कंपनी यूएसबी टाइप सीनोंपोर्ट चार्जर देत नाही. डेल, एचपी आणि आसुस यांसारख्या काही लॅपटॉप निर्मात्यांनाही स्वस्त उपकरणांसह सादर केलेले चार्जर बदलावे लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *