स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन जर गरिबांवर भार टाकणारा ठरला तर ते देशाचे दुर्दैव असेल ; भाजपा (BJP) खासदार वरुण गांधी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक भारतीयाने आपल्या घरावर तिरंगा लावावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावतीने करण्यात आले आहे. देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. मात्र दुसरीकडे यावरून भाजपा (BJP) खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी एक ट्विट करत स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन जर गरिबांवर भार टाकणारा ठरला तर ते देशाचे दुर्दैव असेल असं म्हटलं आहे. वरुण गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये शिधापत्रिकाधारक तिरंगा ध्वज घेण्यासाठी आपल्यावर बळजबरी केली जात असल्याचा आरोप करत आहेत. तसेच तिंरगा ध्वज घेण्यासाठी आम्हाला वीस रुपये द्यायला सांगत आहेत, तुम्ही जर पैसे दिले नाही तर तुम्हाला मोफत धान्य मिळणार नसल्याचेही सांगण्यात आल्याची तक्रार या व्हिडीओमधून करण्यात आली आहे. यावरून वरुण गंधी यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.

काय म्हटलंय वरुण गांधी यांनी?
वरुण गांधी यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. यासोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जर गरिबांवर भार टाकणारा ठरला तर ते देशाचे दुर्दैव असेल. शिधापत्रिकाधारकांना आणि गरिबांना तिरंगा खरेदीची बळजबरी केली जात आहे. जर त्यांनी तिरंगा नाही घेतला तर त्यांना धान्य देखील दिले जात नाहीये. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात तिरंगा आहे. मात्र अशा पद्धतीने जर गरिबांची गळचेपी हेत असेल तर ही गोष्ट लाजिरवाणी असल्याची टीका वरुण गांधी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *