महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट । महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांची बदली होण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती. त्यातच आता महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्याजागी आता सातारा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या आदेशाने राजेश पाटील यांची बदली करून त्यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात कृष्ण प्रकाश यांची बदली करण्यात आली होती. त्याचबरोबर आता राज्यात शिंदे – फडणवीस सरकारच्या काळात राजेश पाटील यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सातारा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या कार्यपद्धतीबाबत नव्या सरकारकडे तक्रारी गेल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे लवकरच त्यांची बदली होईल, अशी जोरदार चर्चा महापालिका प्रशासकीय वर्तुळात रंगली होती.