Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण; पहा आजचा भाव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात वाढ केल्याने सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. त्यानंतर मात्र सोन्याच्या दरात वाढ होत राहिल्याचे पाहायला मिळाले. सलग सुट्ट्यांनंतर मंगळवारी सराफा बाजारात सोन्याच्या आजच्या दरात घसरण दिसून आली. एकूणच आज सराफा बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. सोन्यचा दर आतापर्यंतच्या उच्चांकी दरापेक्षा ४,०२० रुपयांनी स्वस्त राहिला. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम ५६,२०० उच्चांकी किमतीवर पोहचला होता.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशननुसार आज सोन्याचा दर ५२१८० रुपये प्रति दहा ग्रॅम आहे; तर शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो ५२४६१ रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला होता. अशा प्रकारे आज सोन्याचा दर २८१ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडला आहे; तर मंगळवारी चांदीचा दर प्रति किलो ५७०९५ रुपये होता. शेवच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी ५८३५२ प्रति किलोच्या दराने बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळाली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *