शिवसेनेतून शिंदे गट बाहेर का पडला ? या अभिनेत्याने स्पष्टच सांगितले …

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑगस्ट । शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांचा गट बाहेर पडला. हिंदुत्वाच्या मुद्‌द्यावर शिवसेनेतून ( Shiv Sena News ) बाहेर पडल्याचं शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे. शिंदे गटाने भाजपसोबत सत्तास्थापन केल्यानंत शिंदे गट हिंदुत्व विसरले, यावरूनही टीका होताना दिसत आहे. आता नेमकं हिंदुत्व म्हणजे काय, याची सविस्तर व्याख्या अभिनेते शरद पोंक्षे ( Sharad Ponkshe ) यांनी स्पष्ट केली आहे. या राष्ट्रावर जो नितांत प्रेम करतो, या राष्ट्रासाठी जो जीव द्यायला तयार, राष्ट्र की धर्म? असा प्रश्न विचारल्यावर ज्याचं पहिलं उत्तर राष्ट्र येतो. तो हिंदू असल्याचं पोंक्षे यांनी सांगितलं.

जळगाव येथे बाजीराव पेशवे या विषयावर प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान झाले. या कार्यक्रमासाठी शरद पोंक्षे उपस्थित होते. व्याख्यानाचा कार्यक्रम झाल्यानंतर पोंक्षे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांशी बाजीराव पेशवे हा विषय शिक्षणात घ्यायला हवा. त्याशिवाय पुढील पिढीला हे कळणार नाही, अशी मागणीही त्यांनी केली.

हिंदूंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी माध्यमांनी छेडताच शरद पोंक्षे पत्रकारांवर भडकले. यावेळी त्यांनी सविस्तर उत्तर देणं टाळलं आणि माध्यमांवर तोंडसुख घेतलं. नपुंसक या आपल्या वक्तव्यावर माध्यमांनीच वाद निर्माण केल्याची टीका पोंक्षे यांनी यावेळी केली.

शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे यांचे उदाहरण देत, शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदे गट का बाहेर पडला असेल? त्यावर भाष्य केलं. कोणीही एकटा नेता, राज्य किंवा संघटना मोठी होत नाही. म्हणजे एकटेच शिवाजी महाराज असते आणि कोणीच बरोबर नसतं, तरीही स्वराज्य निर्माण झालं नसतं. एकटे संभाजीमहाराज असूनही नसतं चाललं. शिवाजी महाराज मोठे का? तर त्यांनी समाजातील हिरे बरोबर पारखले आणि आपल्या सोबत घेतले. त्याचप्रमाणे बाजीराव पेशाव्यांनीही आपल्या सोबत उत्कृष्ट कामगिरी करणारे हिरे जमा केले. म्हणून त्यांनी स्वराज्याचं पुढे जाऊन साम्रज्य बनवलं. हे आताच्या सर्वच नेतृत्वाने शिकण्यासारखं आहे, असं अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले.

आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत, त्यांना दुखवता कामा नये, त्यांची योग्यवेळी दाखल घेतली पाहिजे. त्यांच्या विचारांना आदर दिला पाहिजे. त्यांची सुखदुःख समजून घेतली पाहिजेत. असं झालं तर कोणी माणसं सोडून जाणार नाहीत कुठेही. शिवाजी महाराजांसाठी जीव द्यायला का तयार व्हायचे, ते मावळ्यासोबत भाकरी खायला बसायचे. राजा असूनही मावळ्यासोबत जेवायचे. मग का तो मावळा आपलं आयुष्य शिवाजी महाराजांवर लुटवायला तयार होणार नाही मग. त्यामुळे शिवाजी महाराज व बाजीराव पेशवे यांच्या प्रमाणे आताच्या नेतृत्वाने हे शिकले पाहिजे, असंही अभिनेते शरद पोंक्षे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *