लॉकडाऊन मुळे तीन हजार लोकांचा रोजगार बुडाला ; धर्माबाद येथील प्रसिध्द मिरची बाजाराला लॉकडाऊन चा फटका

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 ऑनलाईन । नांदेड । विशेष प्रतिनिधी। संजीवकुमार गायकवाड । धर्माबाद येथील प्रसिध्द मिरची बाजाराला लॉकडाऊन चा फटका येथील मिरची मार्केट हे महाराष्ट्र व तेलंगणात मिरचीचा बाजार आहे लॉकडाऊन मुळे मिरची बाजार ठप्प आहे रोज 20ते 25 लाख रुपयाची उलाढाल होत असते येथील मिरची बाजारा मुळे कृषि उत्पन्न बाजार समीती अंतर्गत व्यवहार चालतो. धर्माबाद तालुका हा महाराष्ट्र तेलंगणा राज्यच्या सीमेवरील नांदेड जिल्यात आहे तेलंगणा,हैद्राबाद करीमनगर, निर्मल, निझामाबाद, बोधन,जालना,औरंगाबाद,नांदेड, परभणी, हिंगोली, जिल्यातून हजारो नागरिक धर्माबाद येथे रेल्वे, बस, खाजगीवहानाने येतात.तेलंगणा व आंध्रतील जनता 1वर्षा साठी लागणारी मिरचीघेऊन देठे काडून बारीक दळून घेऊन जातात.

त्या सोबत विविध प्रकारचे डाळी, मसाले, घेऊन जातात त्यामुळे धर्माबादची ही बाजार पेट 6 महिने मिरची मुळे गजबजून असते या मिरची व्यापारी साठी येथे ओद्योगिक वसाहत आहे.या व्यवसायावर सुमारे पाच हजार जणांची रोजीरोटी अवलंबून आहे. असे या औद्योगिक वसाहतीचे चेरमन अमिरोद्दीन सांगतात. या परिसरात मिरचीचे देठ काडून देण्यासाठी शहरातील रत्नाळी, बाळापूर, फुलेनगर, शास्त्रीनगर, रामनगर, सरस्वतीनगर, समतानगर,रमाईनगर,शंकरगंज,येथील महिला मंजूर प्रतिकिलो 10ते15 रुपये घेऊन मिरचीचे देठ काडून देतात म्हणून प्रति महिला 400ते500रुपये रोजगार कमवतात.साधारण पणे तेलंगणा, हेंद्राबाद, वरंगल.खम्मम,गुंटूर,गुलबर्गा, येथून 2 सेवन 3 सेवन s तनDD आदी मिरचीचे नमुने येथे विक्री साठी उपलब्धआहेत या ठिकाणी गुंटूर तेजा. 2 सेवन 15 ते 20 हजार रुपये प्रतिकिंटल आयात होते. गावरान. बडगी. 20ते25हजार भावाने प्रतिकिंटल आयात होते. लॉकडाऊन मुळे आयात केलेला मिरची साठा तसाच पडून आहे.असे येथील मिरची व्यापारी कृष्ण झंवर यांनी बोलून दाखवले तर येथील मिरची कारखान्यात काम करणारे शेशीकलाबाई पतंगे यांनी मुलीच्या लग्नासाठी मिरचीहंगामात कर्ज फेडतो म्हणून मालका कडून कर्ज घेतले होते ते कसे फेडावे म्हणून आर्थिक विवंचनेत असल्याचे दिसलें घरी खाणारे तोंडे 4 हाताला काम नाही. शहरातील संबोध काकाणी यांच्या वतीने 1 टाइम खिचडी वाटप होत आहे. पण बाकी व्यवहार कारणे कठीण झाले आहे. त्या सांगत होत्या.लॉकडाऊन मुळे रोज 3 हजार लोकांचं रोजगार बुडाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *