कॉमेडियन राजू श्रीवास्तव ब्रेन डेड अवस्थेत ; ब्रेन डेड म्हणजे काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑगस्ट । प्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. गेल्या आठवड्यात 12 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआउट (WorkOut) करताना ट्रेडमिलवरून हृदयविकाराचा झटका आल्याने ते पडले. त्यानंतर त्यांना तात्काळ एम्समध्ये (AIIMS-All India Institute of Medical Sciences) दाखल करण्यात आलं होतं.

गेल्या 8 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी सांगितलं की, ‘त्यांच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा नाही. डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांना ब्रेन डेड (Brain Dead) घोषित केलं आहे.

राजू श्रीवास्तव यांच्या मुलीने गुरुवारी त्यांच्या प्रकृती विषयी माहिती दिली. त्यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा नसल्याचं तीने सांगितलं. आपण जाणून घेऊया ब्रेन डेड म्हणजे काय? (What is Brain Dead)

ब्रेन डेड म्हणजे काय? – What is brain dead?
माणसाचा मेंदू पूर्णपणे काम करणं थांबवतो त्या स्थितीला ब्रेन डेड म्हणतात. अशा स्थितीत माणसाच्या मेंदूपर्यंत कोणतेही संकेत पोहोचत नाहीत. ब्रेन डेड झाल्यानंतर माणसाचं शरीर काम करणं थांबवतं. डोळ्यांची उघडझाप, श्वास घेणं आणि शरीराची हालचाल कमी होते असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र अशा स्थितीत व्यक्तीचं हृदय सुरु असतं.

ब्रेन डेड झालेल्या रुग्णाला सामान्यपणे श्वास घेता येत नाही, त्यामुळे रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं, जेणेकरुन त्याचा श्वास सुरु राहिल. ब्रेन डेड झालेल्या रुग्णाची बरे होण्याची शक्यता 0.09 टक्के असते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *