महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑगस्ट । सप्टेंबर महिन्याची चाहूल लागताच लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जोरदार तयारी सुरु होते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होते. यंदा भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजेच ३१ ऑगस्टला गणराज भक्तांच्या भेटीला येणार आहेत. महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये गणपतीसह ज्येष्ठा गौरीचे सुद्धा आगमन होते. ज्येष्ठा गौरी पूजन महाराष्ट्रात विविध पद्धतीने केले जाते. गौरी ही साक्षात माता पार्वतीचे स्वरूप आहे, स्वतः पार्वती माता घरी माहेरपणाला येते अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवसात माहेरवाशिणीच्या आवडीचे गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. यंदा महाराष्ट्रात ज्येष्ठा गौरीचे आवाहन कधी आहे याची तारीख, वेळ व पूजा विधी आपण जाणून घेऊयात…
अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन, असे हे तीन दिवसांचे मूळ व्रत आहे. याला ‘ज्येष्ठागौरी पूजन’ असे म्हटले जाते. यंदा ३ सप्टेंबर रोजी गौरी आवाहन व ५ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे. ४ सप्टेंबर गौराईचे पूजन केले जाणार आहे.
पंचांगानुसार ज्येष्ठागौरी पूजन तिथी
ज्येष्ठा गौरी आवाहन तारीख: ३ सप्टेंबर (शनिवार )
वेळ: रात्री १० वाजून ५६ मिनिटांपर्यंत
ज्येष्ठा गौरी पूजन तारीख: ४ सप्टेंबर (रविवार)
ज्येष्ठा गौरी विसर्जन तारीख: ५ सप्टेंबर (सोमवार)
वेळ: रात्री ८ वाजून ०५ पर्यंत