राजन साळवी शिंदे गटात जाणार? साळवींनी दिलं स्पष्टीकरण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑगस्ट । एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसमोर (Shivsena) इतिहासातलं सगळ्यात मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या 40 आणि 10 अपक्ष अशा एकूण 50 आमदारांनी पाठिंबा दिला, त्यामुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकासआघाडी सरकार कोसळलं.

एकनाथ शिंदे शिवसेनेचे 55 पैकी 40 आमदार घेऊन गेल्यानंतर आता 41वा आमदारही शिंदेंकडे जायच्या तयारीत असल्याचं वृत्त येऊ लागलं. शिंदेंकडे जाणारा हा आमदार कोकणातला असल्याचं बोललं जाऊ लागलं, त्यामुळे शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या नावावरून कुजबूज सुरू झाली. आता स्वत: राजन साळवी यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

आमची निष्ठा मातोश्री कायम चरणी…. काल आज व उद्या फक्त आमची निष्ठा शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे फक्त… असं राजन साळवी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. या ट्वीटमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसोबतचा फोटो जोडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *