Babar Azam: बाबर आजमचं इंग्लिश ऐकून लोकांना आवरेना हसू; VIRAL व्हिडीओवर नेटकऱ्यांची फटकेबाजी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑगस्ट । पाकिस्तान क्रिकेट टीमचा (Cricket Team) कॅप्टन बाबर आझमसोबत घडलं आहे. 18 ऑगस्ट 22 रोजी झालेल्या क्रिकेट मॅचमध्ये पाकिस्तानने नेदरलँड संघावर (Netherlands Team) 7 गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर विजयी संघाचा कॅप्टन म्हणून इंग्रजीत मुलाखत देताना बाबर आझम बराच गोंधळला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर क्रिकेट फॅन्सनी टोमणे हाणत त्याची चांगलीच फिरकी घेतली आहे. ‘आज तक हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलं आहे.

सोशल मीडियावर बाबर आझमला सातत्यानं ट्रोल करण्यात येत आहे. बाबरचं पोट बाहेर निघाल्याचं एका व्हिडिओत दिसल्यानं सामन्याच्या एक दिवस आधी सोशल मीडिया युजर्सनी बाबरला लक्ष्य केलं होतं. मॅच जिंकल्यानंतर मात्र मुलाखतीदरम्यान (Interview) त्याचा इंग्रजी भाषेतील संवाद ऐकून अनेकजण त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. पाकिस्तानच्या टीमने जेव्हा मॅच जिंकली तेव्हा त्याची काही मिनिटांची मुलाखत झाली. त्याचाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात कॅप्टन म्हणून टीमच्या कामगिरीवर आपण नक्कीच आनंदी असाल, एकूणच तुम्हाला यावर काय वाटतं? असा पहिला प्रश्न विचारला गेला. तेव्हा तो थोडासा गोंधळला. काही शब्द बोलून तो थांबला आणि नंतर बोलायला लागला. एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काहीही ताळमेळ नसल्याचं त्याच्या बोलण्यावरून जाणवत होतं. अँकरने विचारलेल्या या पुढील प्रश्नांवरही तो अशाचप्रकारे अडखळत उत्तर देत असल्याचं दिसून आलं. हा व्हिडिओ शेअर करताना त्यावर युजर्सनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *