महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ ऑगस्ट । लांडेवाडी येथे शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह गावकऱ्यांनी व शिवसेना कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे ग्रामपंचायत ते आढळराव पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत जोरदार स्वागत केले.(chief minister eknath shinde visited the residence of shivajirao adharao patil)
या भेटीदरम्यान आढळराव पाटील यांच्याबरोबर शिंदे यांनी भोजन घेतले. तसेच, आढळराव पाटीलांनी 25 कोटींची कामे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मंजूर करुन घेतली.
शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी ग्रामीण विकास, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पीएमआरडीए, सामाजिक न्याय यासह अन्य योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल. सुचविलेल्या २५ कोटी रुपये निधीच्या कामाबाबत तसेच अन्य महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी लवकरच विशेष बैठक मंत्रालयात आयोजित केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.