यंदा सणासुदीमध्ये घर, वाहने, दागिने खरेदी 30% पर्यंत वाढण्याची शक्यता; चांगल्या पावसामुळे उत्पन्नवाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ ऑगस्ट । देशात दोन वर्षांनंतर सणांचा उत्साह कोरोनाच्या निर्बंधांपासून मुक्त आहे. त्यामुळे येत्या अडीच महिन्यांत जोरदार व्यवसाय होण्याची शक्यता आहे. होम अप्लायन्सेस, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, दागिने, वाहने आणि रिअल इस्टेट यांसारख्या क्षेत्रांत गेल्या वर्षाच्या तुलनेत 30% पर्यंत जास्त खरेदी होण्याची अपेक्षा आहे.

यंदा प्रीमियम प्रॉडक्ट्सची विक्री जास्त होईल, असा अप्लायन्सेस कंपन्यांचा अंदाज आहे. गोदरेज अप्लायन्सेसचे बिझनेस हेड कमल नंदी यांनी सांगितले,‘आम्ही वर्षभराची एक तृतीयांश विक्री सणासुदीत करतो. यंदा गेल्या वर्षापेक्षा 30% जास्त माल भरला आहे.’ ओरिएंट इलेक्ट्रिकचे ईव्हीपी अतुल जैन यांनी सांगितले, ‘कंपन्यांनी साठा तयार केला आहे. यंदा एनर्जी इफिशियंट आणि प्रीमियम वस्तूंना जास्त मागणी आहे.’

चांगल्या पावसामुळे उत्पन्नवाढ
दागिने : सोने आयातीत 34% वाढ
जून तिमाहीत सोन्याची आयात 34% वाढली. रिसायकलिंगमध्ये 18% ची वाढ आहे. सोन्याचे दर सर्वोच्च स्तरापेक्षा खालीच आहेत. त्यामुळे ज्वेलरी ब्रँड्स आणि किरकोळ व्यापाऱ्यांना या हंगामात 50% वाढीची अपेक्षा आहे.

रिअल इस्टेट: 60% जास्त विक्री
2022 च्या पहिल्या सहामाहीत 2021च्या तुलनेत 60% जास्त घरांची विक्री झाली. नव्या प्रकल्पांचे लाँचिंग 56% वाढले. हा ट्रेंड सणासुदीच्या हंगामात आणखी वाढू शकतो. मागणी आणखी वाढल्यास दरवाढ होऊ शकते.

वाहन: 19% जास्त कार विक्री
कंपन्यांनी उत्पादन वाढवले आहे. नवे मॉडेल लाँच होत आहेत. जुलैत कारची विक्री कोविडपूर्व स्तरापेक्षा 19% जास्त झाली आहे. दरमहा 3 लाखांपेक्षा जास्त कार बाजारात येत आहेत. विक्री 20% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

आतिथ्य : 2 वर्षांनंतर वाढ
हॉटेल्स, वाहतूक, दळवळण, सेवा यांच्याशी संबंधित इतर क्षेत्रांचा जीडीपीत 16% वाटा आहे. कोरोना काळात मोठी घसरण झाल्यानंतर त्यात वाढ दिसत आहे. ही वाढ 2019 च्या स्तरापेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.

रिटेल: वार्षिक 36% वाढ
देशाचे 8% रोजगार या क्षेत्रात आहेत. कोरोनात मागे पडल्यानंतर 2022 मध्ये हे क्षेत्र वेगाने वाढले. या वर्षी वाढीचा दर 10% असेल. जुलैत रिटेल विक्री 18% जास्त राहिली आहे. वार्षिक आधारावर 36% ची वाढ आहे.

सेवा : यातही दिसत आहे वाढ
देशाच्या जीडीपीत 50% पेक्षा जास्त वाटा सेवा क्षेत्राचा आहे. देशात 27% रोजगार याच क्षेत्रावर अवलंबून आहेत. चाल आर्थिक वर्षात सेवा क्षेत्र 7.8% च्या दराने वाढण्याचा अंदाज आहे. असे दोन वर्षांनंतर घडत आहे.

या कारणांमुळे अपेक्षा

चांगल्या पावसामुळे चांगले पीक येईल. गावांत उत्पन्न वाढेल.मॅन्युफॅक्चरिंग, सेवा क्षेत्रात वाढ कायम आहे. त्यामुळे चांगली वेतनवाढ. सोने-चांदीच्या किमतीत वाढ झालेली नाही, त्यामुळे त्यांची खरेदी वाढू शकते. गृह कर्जाचा दर वाढण्याचा रिअल इस्टेटवर परिणाम दिसला नाही. मागणी सतत कायम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *