महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ ऑगस्ट । प्रसिद्ध आणि लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव (raju srivastav Health Update) सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना मागच्या काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं होतं. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीविषयी वेगवेगळी माहिती समोर येत आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सतत सांगितलं जातंय. अशातच राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीविषयी नवी अपडेट समोर आली आहे.
‘राजू श्रीवास्तव 10 ऑगस्टपासून सतत व्हेंटिलेटरवर आहेत आणि त्यांना शुद्धीवर येण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो असे सांगण्यात येत आहे. राजूच्या कुटुंबीयांनी त्यांच्यासाठी खास पूजा ठेवली असून दिल्लीतच त्यांचा मोठा भाऊ सीपी श्रीवास्तव यांच्या घरी ही पूजा सुरु आहे. पत्नी शिखापासून ते संपूर्ण कुटुंब या पूजेत सामील आहे’, असं टीव्ही 9 नं दिलेल्या ताज्या अहवालात म्हटलं आहे.