औरंगाबादमधील इंजिनिअरचे विकृत कृत्य ; महिलांना पाहून नग्न मूर्तीवर फिरवायचा हात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ ऑगस्ट । औरंगाबादमधील महावितरण कार्यालयात धक्कादायक घटना समोर आली आहे. अधीक्षक अभियंता पदावर कार्यरत असलेला अधिकारी सहकारी महिला कामानिमित्ताने त्याच्या कक्षात गेल्या की टेबलवर ठेवलेल्या स्टीलच्या नग्न मूर्तीवर हात फिरवायचा व अश्लील नजरेने त्या महिलेकडे पाहायचा. अखेर नेहमीच्या या कृत्याला वैतागलेल्या महिलेच्या फिर्यादीवरून आता या चावट अभियंत्या विरोधात एमआयडीसी सिडको ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण मारोतीराव दरोली (वय-५१) असे त्या चावट अधीक्षक अभियंत्याचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शहरातील गारवारे मैदानाजवळ महावितरणचे अधीक्षक अभियंता ग्रामीण मंडळ कार्यालय आहे. त्यामध्ये दरोली हे अधिक्षक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्याच कार्यालयात फिर्यादी महिला अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दरोली यांच्या कॅबिनमध्ये एक स्टीलच्या धातुची नग्नवस्थेतील मूर्ती टेबलावर ठेवलेली असायची.

कार्यालयातील सहकारी महिला कामानिमित्ताने कॅबिनमध्ये गेल्यास दरोली हा महिलांना वाईट नजरेने पाहून त्या नग्न मूर्तीवर अश्लील रित्या हात फिरवायचा. हा प्रकार जानेवारी २०२२ पासून सुरू होता. फिर्यादी अधिकारी महिलेला काहींना काही कामानिमित्ताने दरोलीच्या काबींनमध्ये जावे लागायचे. त्यावेळी दरोली हा महिलेकडे अश्लील नजरेने पाहायचा. त्या महिलेसमोर त्या नग्न मूर्तीला जवळ घेऊन त्या मूर्तीच्या अंगावरून हात फिरवायचा.

नेहमीच्या या किळसवाण्या प्रकराला महिला वैतागली होती. शेवटी पोलीस ठाणे गाठत महिलेने फिर्याद दिली. अधिकारी महिलेच्या फिर्यादीवरून अधीक्षक अभियंता दरोली विरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेने कार्यालयात होणाऱ्या महिला शिक्षणाचा प्रकार ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *